Namaste Trump | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जेवणार सोन्याच्या ताटात | ABP Majha

Continues below advertisement
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद सज्ज झालंय. विमानतळ ते मोटेरा स्टेडियम पर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी नमस्ते ट्रम्पचे बॅनर लावण्यात आले आहेत. ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी अत्यंत चोख बंदोबस्त लावण्यात आलाय. देशातील सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत. ट्रम्प यांना कुठल्याही प्रकारे डास किंवा किटकांचा त्रास होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात धूर फवारणी करण्यात आलीय. ट्रम्प महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमाला भेट देणार आहेत. त्यासाठी आश्रमात खास शामियान्याची उभारणी कऱण्यात आलीय. इतकच नाही तर ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबीय सोन्या-चांदीचं वर्ख असलेल्या ताटात मिष्ठान्नाचा आस्वाद घेणार आहेत. त्यासाठी अरुण पाबूवाला यांनी खास ताट, वाटी, चमचे अशी भांडी बनवण्यात आली आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram