Nagaland: दहशतवादी समजून केलेल्या गोळीबारात 6 नागरिकांचा मृत्यू ABP Majha
नागालँड राज्यातून एक धक्कादायक बातमी हाती येतेय.. दहशतवादी असल्याच्या संशयातून लष्कराच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात ६ जणांचा मृत्यू झाला आहे.. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली असून, नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांनी चौकशीसाठी एसआयटीची घोषणा केली आहे. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.