Mundra Port : ड्रग्ज प्रकरणात व्यवस्थापनाला फायदा झालाय का? याची चौकशी करा, गुजरात विशेष न्यायालयाचे आदेश
Continues below advertisement
Mundra Port : अदानी समूहाकडे मालकी असलेल्या गुजरातमधील मुंद्रा पोर्टवरुन तीन हजार किलोचे ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. अफगाणिस्तानवरुन दोन कंटेनरच्या माध्यमातून आलेलं हिरॉईन (ड्रग्ज) हे तब्बल 15 हजार कोटी किंमतीचे असल्याचं सांगितलं जातंय. ही कारवाई केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या Directorate of Revenue Intelligence (DRI) आणि कस्टम विभागाच्या वतीनं 15 सप्टेंबरला करण्यात आली. या प्रकरणात व्यवस्थापनाला फायदा झालाय का? याची चौकशी करा, असे आदेश गुजरात न्यायालयानं दिले आहेत.
Continues below advertisement