Reservation Counter | आजपासून मर्यादित स्वरुपात रेल्वे स्टेशनवर आरक्षित गाड्यांचे काउंटर सुरु होणार

अखेर देशात रेल्वे सेवा सुरू करण्यास हिरवा कंदील मिळाला आहे. येत्या 1 जूनपासून 200 ट्रेन सुरु केल्या जाणार आहेत. या ट्रेन्सची ऑनलाईन तिकीट बुकिंग काल सकाळी 10 वाजल्यापासून आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर सुरु झाली आहे. पहिल्या दोन तासात 1 लाख 49 हजार प्रवाशांनी तिकीट बुक केले. या तिकीटावर 2 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करणार आहेत. सध्या ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरु असली तरी लवकरच रेल्वे स्थानकावरही तिकीट बुकिंग सुरु होणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola