Speak Up India | मोदी सरकारविरोधात काँग्रेसची 'स्पीक अप इंडिया' मोहीम, 50 लाख कार्यकर्त्यांचा सहभाग
देशात कोरोना (corona) संकट वाढच चाललं आहे. यातच देशातील राजकारण सुद्धा तापत असल्याचं चित्र आहे. केंद्रात 'मोदी सरकार 2.0' (Modi 2.0) च्या एक वर्षपूर्तीच्या मुहुर्तावर 30 मे रोजी भाजप 1000 व्हर्चुअल कॉन्फरंससह अनेक ई-रॅलींचे आयोजन करणार आहे. तर त्याआधीच काँग्रेसनं नरेंद्र मोदी सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. मजूर, शेतकरी आणि छोट्या दुकानदारांसाठी पॅकेजची मागणी करत काँग्रेस (Congress Online Protest) आज ऑनलाईन आंदोलन करणार आहे.