Lockdown Fake Circular | अफवांपासून सावधान, लॉकडाऊनच्या नियमात बदल नाही; राज्य सरकारचं स्पष्टीकरण
राज्यात कुठेही सलून, पार्लर, पार्क, इतर सुविधा 29 मेपासून सुरु होणार नाहीत. यासंदर्भात सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं पत्रक हे खोटं असून अशाप्रकारे कोणतेही आदेश राज्य सरकारने दिलेले नाहीत, असं माहिती विभागाने स्पष्ट केलं आहे. लॉकडाऊनच्या नियमात कोणतेही बदल केले नसल्याचं सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.