Bank Strike | सरकारी बँका आजपासून तीन दिवस बंद, 20 टक्के वेतनवाढीची मागणी
Continues below advertisement
देशातील सर्व सरकारी बँका आज आणि उद्या संपावर गेल्या आहेत. वेतन सुधारणेच्या प्रलंबित मागणीवर काल कोणतीही सहमती झाली नाही. त्यामुळे संपाचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे आज आणि उद्या सरकारी बँका बंद राहतील. याशिवाय संपाला जोडून रविवारची सुटी असल्यानं सलग तीन दिवस बँकांचे व्यवहार कोलमडण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे उद्या केंद्रीय अर्थसंकल्प असताना सर्व सरकारी बँका संपावर असतील. बँक संघटनांनी २० टक्के वेतनवाढीची मागणी केली आहे.
Continues below advertisement