Coronavirus | देशात 24 तासात कोरोनाचे 6088 रुग्ण वाढले, तर रिकव्हरी रेट 40.97 टक्क्यांवर

Continues below advertisement
देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मागील 24 तासात 6 हजार 88 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर 148 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 18 हजार 447 झाली आहे. त्यापैकी 3 हजार 583 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 48 हजार 534 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. म्हणजेच देशाचा रिकव्हरी रेट 40.97 टक्के आहे. सध्या देशात कोरोनाची लागण असलेले म्हणजेच अॅक्टिव्ह रुग्ण 66 हजार 303 आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram