Madhya Pradesh NSUI : मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये NSUIच्या मोर्चावर पोलिसांचा जोरदार लाठीमार
Continues below advertisement
मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये काँग्रेसप्रणित विद्यार्थी संघटना एनएसयूआयतर्फे आयोजित मोर्चावर पोलिसांनी जोरदार लाठीमार केला आहे. वाढती बेरोजगारी आणि शिक्षणाचा वाढता खर्च याविरोधात एनएसयूआयनं हा मोर्चा आयोजित केला होता. आणि हा मोर्चा मुख्यमंत्री निवासाकडे चालला होता. मात्र काँग्रेस कार्यालयातच पोलिसांनी हा मोर्चा अडवला त्यावेळी मोर्चेकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यावेळी मोर्चा नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठिमार सुरू केला.
Continues below advertisement