Mouth Freshener Special Report : माऊथ फ्रेशनर खाताय ? सावधान !
Continues below advertisement
Mouth Freshener Special Report : माऊथ फ्रेशनर खाताय ? सावधान ! हॉटेलमध्ये जेवणानंतर माऊथ फ्रेशनर दिलं जातं. पण, ते खरंच माऊथ फ्रेशनर आहे का हे तपासून घ्यायला हवं. कारण हरियाणाच्या गुरुग्राममध्ये धक्कादायक घटना समोर आलीय, ज्यात माऊथ फ्रेशनरच्या जागी चक्क ड्राय आईस दिला आणि तो खाऊन ग्राहकांच्या तोंडातून रक्त येऊ लागलं. यामुळे ५ जणांची प्रकृती बिघडली. या पाच जणांना रुग्णालयात दाखल केलं असून त्यातील दोन जण अत्यवस्थ आहेत. अंकित कुमार नावाच्या व्यक्तीने रेस्टॉरंटविरोधात आरोप केले असून या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
Continues below advertisement