Monsoon Alert : 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
31 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
भारतीय हवामान विभाग (IMD) ने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून 31 मे रोजी केरळच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. जर हवामान विभागानं वर्तवलेला हा अंदाज खरा ठरला तर देशात दक्षिणी राज्यांमध्ये मान्सून वेळेआधीच दाखल होणार आहे. गुरुवारी मॉन्सून मालदीव-कोमोरिन भागातील काही भागांत पुढे सरकला असून बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पूर्व आणि पूर्व-मध्य प्रदेशांवर पोहोचला आहे.
केरळच्या काही भागांत पावसाळ्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच केरळमधील बर्याच भागांत हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळत आहेत. एर्नाकुलम, अलाप्पुझा, कोट्टायम, इडुक्की, पठानमथिट्टा आणि जिल्ह्यांमध्ये 24 तासांसाठी पावसाची नोंद करण्यात आली असून तिरुअनंतपुरममध्ये 19 मिमी ते 115 मिमी दरम्यान पावसाची नोंद करण्यात आली आहे.