Mohon Bhagwat : भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच : सरसंघचालक मोहन भागवत : ABP Majha
Continues below advertisement
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू आणि मुस्लिमांबद्दल मोठं विधान केल आहे. ते म्हणाले की हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच होते आणि प्रत्येक भारतीय नागरिक हिंदू आहे. पुण्यात ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाउंडेशन आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. मोहन भागवत म्हणाले की, भारतातील अल्पसंख्याक समुदायाला कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही, कारण हिंदूंचे कोणाशीही वैर नाही. ते म्हणाले, 'हिंदू शब्द मातृभूमी, पूर्वज आणि भारतीय संस्कृतीच्या बरोबरीचा आहे. इतर मतांचा तो अनादर नाही. आपल्याला मुस्लिम वर्चस्वाचा नाही तर भारतीय वर्चस्वाचा विचार करावा लागेल. भारताच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे. तसेच समंजस मुस्लिम नेत्यांनी अतिरेक्यांच्या विरोधात खंबीरपणे उभे राहिले पाहिजे .
Continues below advertisement