Mohan Bhagwat on Savarkar : सावरकरांचं हिंदुत्व हाच राष्ट्रवाद : मोहन भागवत

Continues below advertisement

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना बदनाम करण्याची मोहीम जाणीवपू्र्वक राबवण्यात आली असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलाय. दिल्लीत आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. देशात स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत खूप कमी लोकांना माहिती आहे. मात्र त्यांना बदनाम करण्याची मोहीम सातत्याने राबवण्यात आली आणि ती आजही सुरुच असल्याचं सरसंघचालकांनी म्हटलंय. मात्र सावरकर हेच खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्त आणि मानवतावादी व्यक्ती होते. त्यांनी मांडलेला हिंदुत्वाचा विचार हाच राष्ट्रवाद असल्याचंही भागवत यांनी म्हटलंय. 

आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये सावरकरांवरील पुस्तकाच्या लोकार्पण मोहन भागवत बोलत होते. 'वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन' या उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत देखील उपस्थित होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram