Mohan Bhagwat : कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर जनता आणि सरकार बेफिकीर झाले : सरसंघचालक मोहन भागवत

Continues below advertisement

नवी दिल्ली : देशात पहिल्या लाटेनंतर सर्व घटकांतील लोक बेजबाबदार वागल्याचा मुद्दा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज  उपस्थित केला. यामुळे सर्वजण सध्या राष्ट्रव्यापी महामारीचा सामना करत आहे. भागवत म्हणाले की, "पहिल्या लाटेनंतर आपण सर्व बेफिकीर झालो. लोक, सरकारे, प्रशासन.. आपल्या सर्वांना हे ठाऊक होते की दुसरी लाट येणार आहे. डॉक्टरांनी आपल्याला इशाराही दिला होता. मात्र, त्यानंतरही आपण निष्काळजीपण करत राहिलो."

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram