Mohan Bhagwat Full Speech : निवडणुकीच्या प्रचारात तेढ निर्माण केली, संघाला त्यात नाहक ओढण्यात आलं
Mohan Bhagwat Full Speech : निवडणुकीच्या प्रचारात तेढ निर्माण केली, संघाला त्यात नाहक ओढण्यात आलं निवडणूक लढवताना एक मर्यादा असते, मात्र, यंदा देशातील निवडणुकीत त्या मर्यादेचा पालन झालं नाही अशी खंत सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी व्यक्त केली आहे... ते नागपुरात संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयाच्या समारोप सोहळ्यात बोलत होते... निवडणुकीच्या प्रचारामध्ये ज्या पद्धतीने वक्तव्ये करण्यात आली.. त्या वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होईल याचा विचार ही करण्यात आला नाही... आणि त्यामध्ये आम्हालाही ( संघासारख्या संघटनाना ) ओढण्यात आले... टेक्नॉलॉजीचा वापर करून असत्य मांडण्याचा प्रयत्न झाला... हे योग्य नसून अशाने देश कसं चालेल असा सवाल ही सरसंघचालकानी विचारला आहे.. देशात निवडणूक होऊन त्याचे निकाल ही आले, काल सरकार ही स्थापन झाले... निकालांबद्दल ते असे का झाले याची चर्चा सध्या सुरू आहे.... मात्र, निवडणूक दर पाच वर्षानंतर घडणारी देशातील एक घटना असून त्याचे काही नियम आणि डायनामिक्स आहेत... त्या अनुषंगाने ती घडत असते... त्यामुळे यंदा असेच का घडले यात आम्ही संघ म्हणून पडत नाही.... समाजाने आपल मत दिले आहे... त्यानुसार आता सर्व काही होईल... यंदा देशात परत तेच सरकार बनले असून एनडीएचे सरकार परत आले आहे... देशात गेल्या दहा वर्षात बरेच काही चांगले झाले आहे... आर्थिक क्षेत्रात, संरक्षण क्षेत्रात आमची प्रगती झाली आहे... मात्र, अजूनही प्रश्न संपलेले नाही.. त्यामुळे निवडणुकीच्या आवेशात जे काही अतिरेक घडले आहे, त्याच्या पुढे जाऊन आता आपल्याला भविष्याचा विचार करत देशापुढील समस्या सोडवायचे आहे असे सरसंघचालक म्हणाले... दरम्यान सरसंघचालकांनी आज व्यक्त केलेली नाराजी काँग्रेसच्या प्रचाराबद्दल होती की सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसवर आरोप करताना वापरलेल्या मुद्द्यांवर होती हे स्पष्ट नाही.... राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मणिपूर बद्दल केंद्र सरकारच्या भूमिकेवर नाराज आहे का ??? असा प्रश्न विचारण्याचा कारण म्हणजे आज मणिपूरमधील स्फोटक परिस्थिती आणि अशांततेचा चा उल्लेख करत सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचे सरकारचे कान टोचणारे वक्तव्य.... एका वर्षांपासून मणिपूर शांततेची वाट पाहत आहे... त्यापूर्वी दहा वर्ष मणिपूर शांत होतं... मात्र, अचानक तिथे अशांतता निर्माण झाली, किंवा निर्माण करण्यात आली... त्या आगीत मणिपूर आज ही जळत आहे, त्राही त्राही करत आहे, त्याकडे कोण लक्ष घालणार असा सवाल सरसंघचालक यांनी विचारला... ते एवढ्यावरच थांबले नाही तर पुढे मणिपूरकडे प्राधान्याने लक्ष घालणे आवश्यक आहे याची आठवण ही त्यांनी करून दिली... ते आज नागपुरात संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयच्या समारोप सोहळ्यात बोलत होते...