Rajiv Gandhi Foundation: राजीव गांधी फाउंडेशनवर कारवाईचा बडगा, केंद्र सरकारचा मोठा झटका

Continues below advertisement

Rajiv Gandhi Foundation: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) अध्यक्ष असलेल्या 'राजीव गांधी फाउंडेशन' (Rajiv Gandhi Foundation) या स्वयंसेवी संस्थेवर केंद्रीय गृहमंत्रालयाने कारवाई केली आहे. परदेशातून येणाऱ्या निधीबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्याने राजीव गांधी फाउंडेशनवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या संस्थेला चीनकडून मदत मिळत असल्याचा आरोप भाजपकडून सातत्याने करण्यात येत होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै 2020 मध्ये केंद्रीय गृह खात्याने स्थापन केलेल्या एका समितीच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर राजीव गांधी फाउंडेशन परदेशातून निधी स्वीकारू शकत नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram