Model Tenancy Act : घरमालकांना दोन महिन्यांपेक्षा जास्तीचं भाडे अॅडव्हान्स म्हणून घेता येणार नाही!
Continues below advertisement
कोरोनाच्या काळात ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना, कर्मचाऱ्यांना किंवा स्थलांतरितांना शहरात भाड्याने घरे मिळवण्यात अडचणी आल्या त्या पाहता हा एक चिंतेचा विषय आहे. पण येत्या काळात तो सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण केंद्र सरकारने आता मॉडेल टेनन्सी अॅक्ट अर्थात आदर्श भाडेकरु कायद्याला मंजुरी दिली आहे. बुधवारी हा कायदा पारित झाल्याचं केंद्र सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. या आदर्श कायद्याची अंमलबजावणी करावी असंही केंद्र सराकरच्या वतीनं सर्व राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना सांगण्यात आलंय.
Continues below advertisement