Corona-Free Village : महाराष्ट्रात 'कोरोनामुक्त गाव' स्पर्धा, विजेत्यांना 50 लाखांचं बक्षीस

Continues below advertisement

राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या (Corona) कामाला प्रोत्साहन मिळावे आणि गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त झाली पाहिजे. गाव कोरोनामुक्त झाले तर त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यात 'कोरोनामुक्त गाव स्पर्धे'चे  आयोजन करण्यात येणार आहे.  या स्पर्धेची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. कोरोनामुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये  आणि 15  लाख याप्रमाणे बक्षीस दिले जाणार. 6 महसुली विभागात प्रत्येकी 3 प्रमाणे राज्यात एकूण 18 बक्षीसे दिली जाणार. यासाठी बक्षीसाची एकुण रक्कम 5 कोटी 40 लाख रुपये असेल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram