Member of Parliament Oath Ceremony : लोकसभेच्या नवीन सदस्यांचा शपथ ग्रहण सोहळा
Member of Parliament Oath Ceremony : लोकसभेच्या नवीन सदस्यांचा शपथ ग्रहण सोहळा
18 व्या लोकसभेचं (18th Lok Sabha First Session )पहिलं अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून बर्तृहरी महताब (Bhartruhari Mahtab) यांची निवड केली होती. हंगामी लोकसभा अध्यक्षांनी कामकाजाला सुरुवात करताना राष्ट्रपतींनी हंगामी लोकसभा अध्यक्षांना सहकार्य करण्यासाठी हंगामी तालिका अध्यक्ष म्हणून कामकाज पाहण्यासाठी पाच खासदारांची शिफारस केल्याची महिती दिली. यामध्ये सत्ताधारी पक्षातील दोन खासदार तर विरोधी पक्षातील तीन खासदारांचा समावेश होता. यामध्ये काँग्रेसचे खासदार के. सुरेश, द्रमुकचे टीआर. बालू आणि टीएमसीचे सुदीप बंदोपाध्याय, भाजपचे खासदार राधामोहन सिंग आणि फगनसिंग कुलस्ते यांच्या नावाचा समावेश असल्याचं बर्तृहरी महताब यांनी सांगितलं. मात्र, के. सुरेश, टीआर. बालू आणि सुदीप बंदोपाध्याय शपथ घेतली नाही.
बर्तृहरी महताब यांनी सांगितल्याप्रमाणं सभागृहाचे नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम शपथ घेतली. हंगामी अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारपदाची शपथ घेतल्यानंतर काँग्रेसच्या के. सुरेश आणि द्रमुकच्या टीआर बालू यांच्या नावाची घोषणा केली मात्र या दोन्ही खासदारांनी शपथ घेतली नाही. यानंतर माजी केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग यांनी शपथ घेतली. यानंतर भाजपच्या फगनसिंह कुलस्ते यांनी शपथ घेतली. लोकसभेतील अधिकाऱ्यांनी यानंतर टीएमसीच्या सुदीप बंदोपाध्याय यांच्या नावाची घोषण केली. मात्र, सुदीप बंदोपाध्याय यांनी शपथ घेतली नाही.