Medicine QR Code Check : औषधांची सत्यता पडताळणीसाठी लवकरच क्यूआर कोडची सुविधा
बनावट औषधं ओळखण्यासाठी सध्या कोणतीही यंत्रणा किंवा सुविधा ग्राहकांकडे नाही. मात्र लवकरच औषधांची सत्यता पडताळण्यासाठी क्यूआर कोड येणार आहे.. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला औषधांची सविस्तर माहिती मिळणार आहे... सुरुवातीला ठराविक औषधांसाठी हा प्रयोग केला जाईल. ज्यात १०० रुपयांहून अधिक किंमतीच्या औषधांचा समावेश असेल.. तसंच सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या औषधांसाठी लवकरात लवकर क्यूआर कोड कार्यन्वित केला जाईल. खरं तर अनेक वर्षांपासून या प्रयोगाची अंमलबजावणी प्रतीक्षेत आहे... मात्र औषधांच्या किरकोळ बाजारात पुरेशा संसाधनाअभावी ही अंमलबजावणी रखडली होती. मात्र अखेर लवकरच त्याला मुहूर्त मिळणार आहे.