Mayawati: बसपाच्या प्रमुख मायावती निवडणूक लढवणार नाहीत ABP Majha
उत्तर प्रदेशसह इतर पाच राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेपूर्वीपासूनच उत्तर प्रदेशात निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. अशातच उत्तर प्रदेशच्या राजकारणात अनेक चर्चांनी जोर धरला होता. यातील महत्त्वाची चर्चा म्हणजे, बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा यांच्या उमेदवारीबाबत. आता यासंदर्भात माहिती समोर आली आहे. बसपाचे सरचिटणीस सतीश चंद्रा मिश्रा यांनी मोठी घोषणा केली आहे.