Mathura Mosque Case : श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणातही व्हीडिओग्राफी होणार, वाद सुटणार?
ग्यानवापीतल्या मंदिर मशिद वादानंतर वेगवेगळे दावे प्रतिदावे झाले. त्यानंतर न्यायालयाने थेट व्हीडिओग्राफीचे आदेश दिले. पण तसाच आदेश आता दुसऱ्या एका प्रकरणात सुद्धा देण्यात आलाय. हा वाद आहे मथुरेतल्या श्रीकृष्ण जन्मभुमीचा. याचसंदर्भात आता शाही इदगाह मशिदीत सुद्धा व्हीडिओग्राफी करण्यात येणार आहे. हे सगळं प्रकरण काय आहे आणि या वादाचा इतिहास काय आहे जाणून घेऊयात या रिपोर्टमधून.