Mardaani 2 Movie Review I राक्षसी मनोवृत्ती ठेचणारी मर्दानी I एबीपी माझा
Continues below advertisement
सिनेमाचे दिग्दर्शक गोपी पुत्रन हे मूळचे लेखक. त्यांनीच मर्दानीचा पहिला भाग लिहिला होता. आता दुसरा भाग लिहिताना त्यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाचीही जबाबदारी उचलली आहे. लेखनाचं पूर्ण भान असल्यामुळे कथा, पटकथा गोळीबंद कशी असेल याकडे त्यांनी लक्ष दिलं आहे. कथेचा जीव आणि त्याचा विस्तार लक्षात घेता वेळेची मर्यादा लक्षात घेऊन सिनेमाची लांबी न वाढवण्याचा स्तुत्य निर्णय त्यांनी घेतला आहे. अवघ्या 100 मिनिटांचा हा सिनेमा गोळीबंद बनल्यामुळ त्याची पकड कुठेही सुटत नाही.
Continues below advertisement