Maratha Reservation | मराठा आरक्षण मोठ्या खंडपीठाकडे जाणार की नाही? आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Continues below advertisement
सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या केससाठी आज (26 ऑगस्ट) महत्त्वाचा दिवस आहे. हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे द्यायचं की नाही, या मागणीवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे. 27 जुलैला झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाची सलग सुनावणी करण्यास होकार दिला होता, शिवाय हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे द्यायचं की नाही या मागणीवर त्याआधी सुनावणी करु, असंही म्हटलं होतं. त्यानुसार सुनावणी होत आहे. जर मोठ्या खंडपीठाकडे प्रकरण देण्याची मागणी मान्य केली तर नवं खंडपीठ गठित व्हायला वेळ लागेल, त्यानंतर हे नवं खंडपीठ रोजच्या सुनावणीची तारीख ठरवेल. मागच्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या 10 टक्के आर्थिक आरक्षणाचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे देण्याची मागणी मान्य झाली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत काय निर्णय होतो हे पाहणं औत्सुक्याचं असेल.
Continues below advertisement