Rajdhani Express Thief : राजधानी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या मुलांच्या बॅगमध्ये तब्बल 82 मोबाईल
Continues below advertisement
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील आरपीएफ कर्मचाऱ्यांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. राजधानी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या या दोन मुलांच्या बॅगमध्ये तब्बल ८२ मोबाईल सापडले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत आठ लाखांपेक्षा जास्त आहे. कांचीपुरम इथून एका मोबाईल दुकानातून चोरी करुन ही दोन मुले पळून जात होती. त्यामुळे नागपूर स्टेशनवरील आरपीएफ कर्मचाऱ्यांना राजधानी एक्सप्रेसमध्ये सर्च ऑपरेशनदरम्यान दोन अल्पवयीन मुले चार मोठ्या बॅगसोबत आढळली. या चार बॅगमध्ये एकूण ८२ मोबाईल आरपीएफ कर्मचाऱ्यांना सापडले. या मुलांना ताब्यात घेतलं असून लोहमार्ग पोलिसांकडे पुढील कारवाईसाठी हस्तांतरित केलं आहे. ही मुलं मूळची बिहारमधील रहिवासी आहेत.
Continues below advertisement