Manipur Voilence : मणिपूरमधील ८ जिल्ह्यांमध्ये हिंसाचार, दिसताच क्षणी गोळ्या मारण्याचे आदेश
मणिपूरमधील ८ जिल्ह्यांमध्ये हिंसाचार उसळला असून दंगलखोरांना दिसताच क्षणी गोळ्या मारण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेत... हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर लष्कराने काही भागांमध्ये फ्लॅग मार्च काढलाय... बुधवारी आदिवासी आंदोलनाच्या दरम्यान हिंसाचार उसळला... या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी व्हिडीओच्या माध्यमातून लोकांना शांततेचं आवाहन केलंय.... तसेच कुणी तोडफोड, हिंसाचार करणारा असेल त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिलाय...मणिपूरमध्ये अनेक दिवसांपासून आदिवासी आणि बहुसंख्य मेईती समुदायामध्ये तणाव आहे... बुधवारी रात्री या तणावाचे रुपांतर हिंसाचारात झालं... त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफल्सच्या अनेक तुकड्या तातडीने रात्रभर तैनात करण्यात आल्या... हिंसाचारामुळे 9 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय.... दरम्यान, दंगलीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय.