Delhi Crime : ड्रग्जसाठी केलं 10 वर्षीय मुलाचं अपहरण, आरोपीला मुंबईत अटक

Continues below advertisement

व्यसनासाठी कोणी काय करेल याचा काही नेम नाही, अशीच काहीशी धक्कादायक घटना मुंबईमध्ये उघडकीस आली, पण जी घडली होती दिल्लीत. ड्रग्जसाठी पैसे हवे होते एका व्यक्तीनं थेट 10 वर्षीय मुलाचं अपहरण केलं. दिल्लीतल्या मानसरोवर भागात हा प्रकार २५ नोव्हेंबरला घडला. महिलेनं मुलगा हरवल्याची तक्रार पोलिसात दिली. त्यानंतर शोध घेतला असता मुलगा राहत असलेल्या इमारतीतील शिवशंकर नावाचा व्यक्तीही त्याच दिवसापासून बेपत्ता असल्याचं पोलिसांना कळलं. त्यांनी शिवशंकरला फोन केला असता त्यानं पठाणकोटमध्ये असल्याचं सांगितलं. पण पोलिसांनी लोकेशन ट्रेस केलं असता तो मुंबईतल्या धारावीत असल्याचं कळालं. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांची मदत मागितली. मुंबई पोलिसांच्या पथकानं आरोपीला सापळा रचून अटक केलं आणि 10 वर्षांच्या मुलाचीही सुखरुप सुटका केली. यावेळी शिवशंकरच्या चौकशीत त्याने मुलाचं अपहरण पैशासाठी केलं होतं.. मुलाला विकून शिवशंकर ड्रग्सचं व्यसन पूर्ण करणार होता.. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका लहान मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram