Mamta Banerjee : ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा चांगलाच गाजतोय, नेमकं काय काय घडलं आहे या दौऱ्यात ?

Continues below advertisement

मुंबई : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएच्या व्यतिरिक्त वेगळा पर्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असून जे लढतील त्या सर्वांना सोबत घेतलं जाईल असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय. ममता बॅनर्जींनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर त्या बोलत होत्या. 

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "फॅसिस्टवादाच्या विरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे. सध्याच्या सत्तेविरोधात पर्यायी व्यवस्था उभी राहणं अत्यावश्यक आहे. भाजप विरोधात जे लढतील त्या सर्वांना एकत्र घेणार असून यूपीए व्यतिरिक्त वेगळा पर्याय देणार आहे."

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram