Mallikarjun kharge On BJP :  आमची बँक खाती गोठवून दबाव आणण्याचा प्रयत्न खरगेंचा भाजपवर हल्लाबोल

Congress PC Updates: काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची बँक खाती गोठवण्यात आल्याचं सांगितलं. काँग्रेसला लोकसभा निवडणूक लढवताच येऊ नये, म्हणून सत्ताधाऱ्यांनी हे कृत्य केलं आहे. गुरुवारी (21 मार्च) काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना खर्गे म्हणाले की, आपल्याला लोकशाही वाचवायची असून सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे. देशातील संसाधनं, प्रसारमाध्यमं आणि घटनात्मक आणि न्यायिक संस्थांवर सरकारचं नियंत्रण असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola