Majha Katta with Prashant Bhushan एक रुपयाचं प्रकरण नेमकं काय आहे? प्रशांत भूषण यांचा स्फोटक कट्टा

Continues below advertisement
सुप्रीम कोर्ट आणि ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांच्यातील वाद अवघ्या देशाने काही दिवसांपापूर्वी पाहिला. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर दिलासा मिळाला ही पहिली भावना होती, असं प्रशांत भूषण यांनी म्हटलं. मात्र सुप्रीम कोर्टाचा निकाल मी नंबर वाचला त्यामध्ये माझ्याबद्दल अनेक खराब गोष्टी यामध्ये लिहिल्या होत्या. मात्र माझ्यावर केवळ 1 रुपयांची दंडात्मक कारवाई झाली याचं मला आश्चर्य वाटलं, अशी प्रतिक्रिया प्रशांत भूषण यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलताना दिली. सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय मला मान्यच करावा लागला असता. जर शिक्षा म्हणून कारागृहात रवानगी केली असती, तर मला जावं लागलं असतं. मात्र मला कारागृहात जाण्याची इच्छा नव्हती आणि कोर्टानेही एक रुपया दंड भरा अन्यथा कारावासाची शिक्षा भोगावी असा निर्णय दिला. त्यामुळे मी एक रुपया दंड भरणे हा पर्याय निवडला, असं प्रशांत भूषण यांनी सांगितलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram