Ajit Pawar on Pune Lockdown | पुण्यातील लॉकडाऊन व्यापाऱ्यांच्या दबावामुळे हटवला,अजित पवारांचा खुलासा
Continues below advertisement
पुण्यातील लॉकडाऊन हे व्यापाऱ्यांच्या दबावामुळे हटवावा लागला असा खुलासा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी केला. पुण्यातील लॉकडाऊन तात्काळ हटवू नये अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची इच्छा होती, असं शिवसेनेनं म्हटलं होतं. "आम्ही स्वतः म्हणतोय लॉकडाऊन उठवा, मग तुम्ही का उठवत नाही." अशी मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांकडून मागणी होत होती. तसेच हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती बंद केली तेव्हा भाजीपाला मिळत नाही. अशी ओरड सुरु झाली. त्यावेळी ही आमच्यावर दबाव आला, असं अजित पवारांनी लॉकडाऊन उठवण्यामागचं कारण स्पष्ट केलं.
Continues below advertisement