Gallantry Awards 2021 : गलवान खोऱ्यात हौतात्म मिळालेल्या कर्नल संतोष बाबू यांना महावीर चक्र
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज संरक्षण अलंकरण पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये संरक्षण मंत्रालयाच्या वतीने ‘संरक्षण अलंकरण पुरस्कार -2020’ चे वितरण करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात उल्लेखनीय शौर्य, दुर्दम्य साहस आणि समर्पण वृत्तीच्या प्रदर्शनासाठी अधिकारी व जवानांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती भवनमध्ये शूर सैनिकांच्या आठवणींनी वातावरण भावूक झाले होते. लदाखमध्ये गलवान खोऱ्यात ऑपरेशन स्नो लेपर्डदरम्यान हौतात्म प्राप्त झालेले कर्नल संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीर चक्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पत्नी आणि आईकडे हा पुरस्कार सपूर्द केला. महावीर चक्र दुसरा सर्वात मोठा पुरस्कार आहे.
Tags :
Ramnath Kovind Galwan Valley Galwan Santosh Babu Gallantry Awards Mahavir Chakra Gallantry Awards 2021