ST Strike : कामगार संघटना - अनिल परब यांच्यात चर्चा, एसटी संपावर काय तोडगा?
मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचाऱ्यांमधील बैठक संपली आहे. या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचं अनिल परब यांनी सांगितलं आहे. जो पर्यंत यामध्ये काही तोडगा निघत नाही तोपर्यंत दुसरे काही पर्याय असतील तर एसटी कर्मचाऱ्यांनी द्यावा असं आवाहन अनिल परब यांनी केलं आहे. चर्चा सकारात्मक झाली असून या प्रश्नी उद्या सकाळी 11 वाजता पुन्हा बैठक होणार आहे.