ABP News

Maha Kumbh 2025 ; चेंगराचेंगरी ते अमृतस्नान; प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याचे अपडेट्स Special Report

Continues below advertisement

प्रयागराज महाकुंभमेळ्यात मध्यरात्री चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकार अलर्ट मोडवर आहे. अशा घटना टाळण्यासाठी प्रयागराजमध्ये प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येतेय..याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी..पाहुयात

दरम्यान एकीकडे चेंगराचेंगरीमुळे या परिसरावर दुःखाची छाया पसरलीय. सकाळी १० पासून प्रतिकात्मक अमृतस्नान करण्यास सुरूवात झाली. पहाटेपासून विविध घाटांवर ३ कोटींहून अधिक लोकांनी स्नान केल्याची प्रशासनाची माहिती आहे. मात्र विविध आखाड्यांनी केवळ प्रतिकात्मक स्नान करण्याची घोषणा केलीय. प्रत्येक आखाड्याचे केवळ ३० ते ५० संन्यासी देवतांसह स्नानाला जातील. मोठे संत महात्मे आज अमृतस्नान करणार नाहीत. शाही रथ आणि बँड घेऊन शाहीस्नानाला जाणार नाहीत. 

प्रयागराजमध्ये परंपरेनुसार शाही स्नानापूर्वी भव्य शोभायात्रा पार पडली. महानिर्वाणी, अटल, निरंजनी आणि आनंद आखाड्यासह इतर आखाड्यांचे साधू महंत या शोभायात्रेत सहभागी झाले होते. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर पोलिसांच्या चोख बंदोबस्तात ही शोभायात्रा काढण्यात आली. 
आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मनोज्ञा लोईवाल यांनी...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram