Sadguru Jaggu Vasudev : Madras High Court कडून सद्गुरू जग्गू वासूदेव यांची जोरदार कानउघडणी

Continues below advertisement

मद्रास हायकोर्टाने सद्गुरू जग्गू वासूदेव यांची जोरदार कानउघडणी केलीय. स्वतःची मुलगी लग्न करून व्यवस्थित संसार करत असताना हे गृहस्थ इतरांच्या मुलींना संन्यासी व्हायला का उद्युक्त करत आहेत असा सवाल हायकोर्टाने केलाय. मुलींचं मुंडण करणं, संसार त्यागणं, योग केंद्रात संन्यासी आयुष्य जगणं यासाठी का प्रोत्साहन देत आहेत असा सवाल कोर्टाने केलाय. कोईंबतूरमधील निवृत्त प्राध्यापक एस. कामराज यांनी हायकोर्टात धाव घेतलीय. आपल्या दोन उच्चशिक्षित मुलींना ब्रेनवॉश करून जग्गी वासूदेव यांच्या योगकेंद्रात ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केलाय. संबंधित महिला ४२ आणि ३९ वर्षांच्या आहेत. मात्र आपण स्वतःच्या मर्जीनेच केंद्रात राहात असल्याचं स्पष्टीकरण या दोन्ही महिलांनी कोर्टासमोर दिलंय. मात्र अध्यात्माच्या मार्गावर जाण्याआधी आपल्या मातापित्यांकडे दुर्लक्ष करणंही पाप नाही का असा सवाल हायकोर्टाने या महिलांना केलाय. आपल्या मुलींनी आपला त्याग करत योग केंद्रात आसरा घेतल्यानंतर आपलं आयुष्य नरकासमान झाल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram