Lucky Ali at Ideas of India 2023 : वडील सुपरस्टार असूनही लकी अली यांनी का निवडलं संगीत क्षेत्र?
abp majha web team
Updated at:
24 Feb 2023 03:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLucky Ali In ABP Network Ideas of India Summit : एबीपी नेटवर्कच्या (ABP Network) 'आयडियाज ऑफ इंडिया समिट 2023' (Ideas of India Summit 2023) परिसंवादामध्ये गायक, अभिनेते लकी अली (Lucky Ali) यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारांवर भाष्य केलं. लकी अली म्हणाले,"आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. मी खचल्यानंतर माझे वडील कायम माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत. वडील सुपरस्टार असूनही मी संगीतक्षेत्र निवडलं. माझ्या आयुष्यात सिनेमाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. वडील सिनेसृष्टीत असल्याने मी अनेकदा त्यांच्यासोबत सिनेमाच्या सेटवर गेलो आहे. पण अभिनयापेक्षा मला संगीताची गोडी लागली".