New Army Chief : लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची भारताच्या लष्करप्रमुखपदी नियुक्ती
New Army Chief : भारतीय लष्कराला एका पाठोपाठ एक दोन मराठमोळे लष्करप्रमुख लाभले आहेत. सध्याचे लष्करप्रमुख मनोज नरवणे हे देखील मराठमोळे असून ते या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर आणखी एका मराठी लेफ्टनंट जनरल यांच्याकडे भारतीय लष्कराची कमान सोपविण्यात येणार आहे. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे (Lt gen Manoj Pande) हे देशाचे नवे लष्करप्रमुख (Chief of the Army) असतील. त्यांच्या नियुक्तीला केंद्र सरकारने हिरवा कंदील दर्शविला आहे.