Lockdown 2 | लॉकडाऊन वाढला; रेल्वेची प्रवासी वाहतूक 3 मेपर्यंत बंद
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून प्रवासी रेल्वे सेवा 3 मेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी मालगाड्या चालू राहणार असल्याचं रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. मुंबईतील लोकल ट्रेनची वाहतूकही त्यामुळे बंदच राहणार आहे.
Continues below advertisement