New Delhi : ब्रिगेडियर-लिड्डर यांना अखेरचा निरोप ABP Majha
कुन्नूर हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालेले सीडीएस रावत यांचे सुरक्षा सल्लागार ब्रिगेडियर एल एस लिड्डर यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. दिल्लीतल्या बरार स्क्वॉयर स्मशनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लिड्डर यांच्यामागे त्यांची पत्नी पत्नी गितीका लिड्डर आणि मुलगी आशना लिड्डर असा परिवार आहे. आज दिल्लीत लिड्डर यांची कन्या आशना हिनं वडिलांना मुखाग्नी दिला. लष्करातील एक अतिशय तल्लख अधिकारी अशी लिड्डर यांची ओळख होती. लिड्डर यांचं प्रमोशन झालेलं. मात्र खांद्यावर प्रमोशनचे स्टार लागण्याआधीच त्यांचं अपघाती निधन झालंय.