Gopichand Padalkar : आरोग्य मंत्र्यांचा आणि घोटाळेबाजांचा संबंध नेमका काय? पडळकरांचा सवाल ABP Majha

प्रशासनात आपल्याच मर्जीतले-ताटाखालचे अधिकारी बसवून त्याच्या मार्फ़त ब्लॅक लिस्टेट कंपन्यांना आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षा कंत्राटं द्यायची, जेणेकरुन  पदभरतीमध्ये वसूलीचा घोडे बाजार चालवण्याची  आघाडी सरकारची परम्परा राखता आली पाहिजे ,आरोग्यमंत्र्यांचे हे कारनामे आरोग्य विभागाच्या पदभरती घोटाळ्यामुळं पुराव्यानिशी सिद्ध झालेत. हे सरकार आता अधिकृतरित्या वसूली सरकार म्हणून मान्यता प्राप्त झालेलं आहे. होतकरू विद्यार्थ्यांचा, उमेदवारांचा गळा आवळणाऱ्या घोटाळ्याचे धागे-दोरे थेट मंत्रालयापर्यंत  पोहचलेले आहेत. आणि या पेपर फुटीच्या लिंक आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यापर्यंत पोहचल्यात.  म्हणजे या सगळ्या घोटाळेबाजीला राज्य सरकारचंच अभय होतं का? असा सवाल उपस्थित होतोय. आरोग्य मंत्र्यांचा व घोटाळेबाजाचा संबंध नेमका काय आहे ? हे जनतेला कळालं पाहिजे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola