Lalu Prasad Yadav:जमिनीच्या मोबदल्यात नोकरी घोटाळा प्रकरण, लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाला दिलासा
Lalu Prasad Yadav : जमिनीच्या मोबदल्यात नोकरी घोटाळा प्रकरण, लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाला दिलासा
लॅण्ड फॉर जॉब घोटाळा म्हणजेच जमिनीच्या मोबदल्यात नोकरी घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने सीबीआयच्या पुरवणी आरोपपत्रावर सुनावणी करताना राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासह, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि खासदार मीसा भारती यांना जामीन मंजूर केला आहे. ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीन मिळाला आहे.