Pimpri Chinchwad : निवृत्त कलाशिक्षकांनी साकारली बेलूर मठाची भव्य-दिव्य प्रतिकृती : ABP Majha
तुम्ही निवृत्त झालाय? आणि तुमचं वय ६९ आहे अशा स्थितीत तुम्ही काय करणार? कुठलीही सामान्य व्यक्ती असा विचार करतेच की आपण आपल्या कुटुंबियांना वेळ देऊ. नातवंडांसोबत खेळू असंच असणार.. पण याच स्टिरिओटाईपला अपवाद ठरलेत पिंपरी चिंचवडचे निवृत्त कलाशिक्षक सुधाकर शिंदे. त्यांनी चक्क वेस्ट बंगालच्या बेलूर मठाची भव्य दिव्य प्रतिकृती साकारलेली आहे. सर्व धर्म समभावाचा संदेश देणाऱ्या कलाकृतीवर सुधाकरांनी दीड वर्षांची मेहनत घेतलीये. या कलाकृतीची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने सुद्धा घेतली आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नाझिम मुल्ला यांनी. पाहूयात