Lakhimpur : Priyanka Gandhi पोलिसांच्या ताब्यात, खोली स्वच्छ करतानाचा प्रियांकांचा Video Viral

Continues below advertisement

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीमध्ये (Lakhimpur Kheri) रविवारी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. लखीमपूर खेरी या ठिकाणी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटायला जाणाऱ्या काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांना अटक केल्याची माहिती युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांनी दिली आहे. 

 

युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "भाजपकडून जे अपेक्षित होतं शेवटी तेच घडलं. महात्मा गांधींच्या लोकशाहीवादी देशात गोडसेच्या भक्तांनी भर पावसात आणि पोलिसांशी संघर्ष करत शेतकऱ्यांच्या भेटीला जाणाऱ्या आमच्या नेत्या प्रियांका गांधी यांना हरगाव मधून अटक केली आहे. मोठ्या लढाईची ही तर केवळ सुरुवात आहे."

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram