Lakhimpur Violence : अजय मिश्रा यांना मंत्रिपदावरुन तात्काळ दूर करा; काँग्रेसच्या शिष्टमंडळाची राष्ट्रपतींकडे मागणी
लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरुन राहुल गांधींच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राष्ट्रपतींची भेट घेतली. लखीमपूर हिंसाचारातील पीडितांना लवकरात लवकर न्याय देण्याच्या मागणीचं निवेदन काँग्रेस शिष्टमंडळानं राष्ट्रपतींना दिलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवनात केवळ पाच जणांना परवानगी देण्यात आली होती.