Singhu Border Kisan Morcha : तीन कृषी कायदे रद्द करणं हा देशातील शेतकऱ्यांचा विजय : अशोक ढवळे

Continues below advertisement

जोपर्यंत शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य पुर्ण होत नाहीत. तोपर्यंत शेतकरी आंदोलन न संपवण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला. सिंघु बॉर्डर वर  संयुक्त किसान मोर्चाची आज एक मीटिंग झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आलाय. याशिवाय पुढील संघर्षाची रणनीति ठरवण्यासाठी आणि केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यासाठी ५ सदस्यीय समितीही स्थापन करण्यात आली. समितीत  बलबीर सिंह राजेवाल, गुरनाम चढ़ूनी, युद्धवीर सिंह, शिवकुमार कक्का, अशोक ढवळे यांचा समावेश करण्यात आला आहे. या बैठकीत एमएसपीसाठी समिती स्थापन करणे, शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेणे, शेतकऱ्यांना मदत देणे आणि अन्य मागण्यांवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी केंद्र सरकारला दोन दिवसांचा वेळ देण्यात आलाय. ७ डिसेंबरला पुन्हा संयुक्त किसान मोर्चाची बैठक घेण्यात येणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram