Kirit Somaiya: किरीट सोमय्यांना मारहाण करणाऱ्या 'त्या' शिवसैनिकाला अटक ABP Majha
abp majha web team
Updated at:
07 Feb 2022 08:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकिरीट सोमय्यांवरील हल्ल्याप्रकरणी भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. पुण्यात सोमय्यांवर हल्ला केल्याप्रकरणी आठ शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलीय. हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप आग्रही असून त्यासाठी आज आंदोलन करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या शहराध्यक्षांसह पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा नोंदवून पोलिसांनी अटक केलीय. या कारवाईनंतरही भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष तीव्र होण्याची चिन्हं आहेत. गेल्या काही वर्षांत तोडफोड आणि मारहाणीपासून बदललेली शिवसेना या प्रकाराचं समर्थन करणार का याबाबत उत्सुकता आहे.