Kirit Somaiya On PFI : पीएफआयच्या देशविरोधी हालचालींवर केंद्र सरकार कारवाई करणार : किरीट सोमय्या

Continues below advertisement

Ban On PFI: मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि इतर काही संघटनांवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. पीएफआय संघटनेवर दहशतवादी आणि देशविरोधी कारवाया केल्याचा ठपका तपास यंत्रणांनी ठेवला आहे. पीएफआयच्या कारवाया लक्षात घेऊन तपास यंत्रणांनी संघटनेवर बंदी घालण्याची शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाला केली होती. त्यावर गृहमंत्रालयाने अध्यादेश काढत बंदी घातली.  PFI संघटनेला अखाती देशातून टेरर फंडींग होत होतं. या संस्थेच्या देश विरोधी हालचालींवर केंद्र सरकार कारवाई करणार असल्याची माहिती भाजपनेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram