Kerala मध्ये आभाळ फाटलं! रस्त्यांचे झाले धबधबे, ठिकठिकाणी पुरामुळे लोक वाहून गेले
Continues below advertisement
Kerala Floods : केरळमध्ये आभाळ फाटलंय. संपूर्ण राज्यात मुसळधार पावसामुळे 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण बेपत्ता आहेत. परतीच्या पावसामुळं अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. भूस्खलनामुळे अनेक नागरिक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. केरळच्या पाच जिल्ह्यांत दोन दिवस रेड अलर्ट तर सात जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील गंभीर पूरस्थिती पाहता केरळच्या मुख्यमंत्र्यांनी लष्कराला पाचारण करण्याची विनंती केली असून अनेक भागांत लष्कराच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
Continues below advertisement