Kerala Floods : केरळमध्ये परतीच्या पावसाचा धुमाकूळ; मृतांची संख्या वाढून 31 वर : ABP Majha

केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि त्यामुळे उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे जीव गमावलेल्यांची संख्या वाढून 31 वर पोहोचली आहे. केरळमधील पूरग्रस्त भागांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, अनेक पूरग्रस्त भागांत लष्कर आणि एनडीआरएफच्या पथकांकडून बचाव कार्य सुरु आहे. केरळातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. तसेच पटनमथीटाच्या खालच्या भागांत आज पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. या भागांत एनडीआरएफची विशेष पथकं तैनात करण्यात आली आहे. तसेच या भागांतील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola