Karpoori Thakur : बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकुर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर
Continues below advertisement
नवी दिल्ली: बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकुर ( Karpoori Thakur) यांना देशातील सर्वाच्य पुरस्कार समजला जाणार भारतरत्न जाहीर (Bharat Ratna Awrad) करण्यात आला आहे. कर्पूरी ठाकुर हे दोनवेळा बिहारचे मुख्यमंत्री होते. तसेच ते त्यांच्या साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध होते. कर्पूरी ठाकुर यांची बुधवारी म्हणजे 24 जानेवारी रोजी शंभरावी जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. बिहारमध्ये जातीय जनगणना आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापलं असताना केंद्र सरकारने कर्पूरी ठाकुर यांना या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं आहे.
Continues below advertisement